दिवसें दिवस शिक्षण महाग आणि दुरापास्त होत आहे. ज्यांना जे शिकायचं ते शिकण्याचा विचार न होता आपली प्रजा ही आपली असेट आहे असे समजून शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे. हे नुसते घातक नसून समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. पैसा आणि प्रतिष्ठा यांचे नाते अधोरेखित करून आपण बटबटीत आणि बाजारू अर्थव्यवस्थेला बळी पडत आहोत याचे भान सुटले आहे. या पिढीसमोर आपण आदर्शांची पेरणी करू शकलो नाही